डॉ. आंबेडकरांसारख्या लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांसाठी आजीवन खडतर कष्ट करणाऱ्या नेत्याला धर्मपरिवर्तनासाठी ‘बौद्ध तत्त्वज्ञाना’ची ओढ लागावी, यात नवल नाही!
बौद्ध तत्त्वज्ञान पृथ्वीवरील मानवाचे जीवन आणि समाजातील इतर मानवांशी त्याचे संबंध यांना मार्गदर्शन करणारे, वळण लावणारे आहे. मानवाच्या ऐहिक जीवनाकडे ते वैज्ञानिक दृष्टीतून पाहते, परमेश्वराचे अस्तित्व नाकारते. त्याचप्रमाणे पुनर्जन्म, आत्मा, रूढी आणि अंधश्रद्धा व चमत्कार या सर्वांवर या तत्त्वज्ञानाने साफ अविश्वास दाखवला आहे. त्यात समता, न्याय, बंधुत्व, अहिंसा आणि करुणा यावर भर आहे. नैतिकता हा त्याचा पाया आहे.......